Mar 8, 2011

१०) कैवल्याची मूर्ती

कैवल्याची मूर्ती
प्रियेस म्हणेल |
मर्म हि जाणेल
कैवल्याचे || १ ||

प्रियेच्या लोचनी
पाहिल ब्रह्मांड |
विश्वाचे भ्रमन
नको मला || २ ||

कर्म तेच सांगा
मम पामराला |
पूजील प्रियेला,
रात दिनी || ३ ||

नित्य, सदा गातो
गुण मी प्रियेचे |
याहुनी या 'वाचे'
काय श्रेष्ठ ? || ४ ||

रमा म्हणे मज,
अवघ्याचा कंटाळा |
एक प्रियतमा,
आवडसी || ५ ||

- रमेश ठोंबरे

९. || लागता समाधी ||

लागता समाधी
प्रियेच्या भक्तीची |
परीक्षा शक्तीची
नको नको || १ ||

मोडेल समाधी
कोणी एक नर |
दुर्जन तो ठार
समजावा || २ ||

हासन्यावरी का
नेता प्रिया संग |
समाधीत भंग
आणू नये || ३ ||

प्रियेची महती
तुम्हास ना ठाव |
पूजताती देव
दगडाचे || ४ ||

रमा म्हणे मज
सर्वाचा कंटाळा |
एक प्रियतमा
आवडसी || ५ ||

- रमेश ठोंबरे

८. || प्रियेची ती भेट ||


प्रियेची ती भेट
पहिलीच झाली |
स्वप्नी मम आली
पहाटेच्या || १ ||

पहाटेचे स्वप्नं
उलटे प्रहर |
आता तो विरह
साहवेना || २ ||

भेटेल ती कधी
लागलीच आस |
घेतला मी ध्यास
पहाटेचा || ३ ||

पहाटेच स्वप्नं
सत्यात ते आलं |
दर्शन ते दिले
आज पुन्हा || ४ ||

संपणार कधी
स्वप्नांचा हा खेळ |
काढ आता वेळ
सत्यातही || ५ ||

- रमेश ठोंबरे

७. || दर्पणात पाहे ||

दर्पणात पाहे,
प्रिया तिचे रूप |
दर्पणहि खूप
लाजतसे || १ ||

प्रियेच्या रूपाचा,
तोही का दिवाना |
न जाने जमाना
मर्म याचे || २ ||

दावितो प्रियेला,
रोज नवी छबी |
हीच त्याचे खुबी
भुलविते || ३ ||

घळली म्हणुनी,
प्रिया दर्पणास |
देई दर्शनास
वेळ त्याला || ४ ||

तो हि मग थोडा
फुगवी छातीस |
दाखवी ख्यातीस
जमाण्याच्या || ५ ||

- रमेश ठोंबरे

६. || प्रियेसाठी जीव ||


प्रियेसाठी जीव,
टाकीला गहाण |
प्रिया हीच जान
मज साठी || १ ||

प्रीयेचाच ध्यास,
लागला जीवाला |
पुन्हा - पुन्हा भास
नाविन्याचा || २ ||

दर्शनच तुझे,
सुखावेल नेत्र |
डोयिचे हे छत्र
हाललेले || ३ ||

हरवली भूक
लागेना तहान |
भक्त तुझा जाण
मीच एक || ४ ||

भेटीसाठी आता,
आस्तिक मी झालो |
पायरीशी आलो
दास तुझा || ५ ||

- रमेश ठोंबरे

५. || हातामध्ये वीणा ||


हातामध्ये वीणा
भाव तो दिवाना |
भक्त तोची जाना,
प्रेयसीचा || १ ||

भटकला जरी
देऊ नका दोष |
मुखी मंत्र घोष
प्रेम - प्रेम || २ ||

चालतो वेगळा
मार्ग तो प्रेमाचा |
करावा नेमाचा,
गुरु तोच || ३ ||

शिष्यासही देतो,
प्रेमाचा प्रसाद |
प्रेयसीची साद,
ऐकवितो || ४ ||

रमा म्हणे बघा,
तोची एक नर |
करील उद्धार,
प्रेमाचा हो || ५ ||

- रमेश ठोंबरे

4. || कॉलेजात प्रिया ||

कॉलेजात प्रिया,
भेटलीच नाही |
दिशा मग दाही,
शोधीयल्या || १ ||

कॉलेजचा कट्टा,
तो हि झाला सुना |
तासही तो पुन्हा,
भरलेला || २ ||

फळ्यावर काळ्या,
गणिताचा घोळ |
लागे कसा मेळ,
नजरेचा || ३ ||

भिंगातून पाहे,
सर तो खडूस |
फेके तो 'खडू' स
माझ्या कडे || ४ ||

भंगलेच पुन्हा,
स्वप्न ते मनीचे
पाकीट 'मनी' चे
रिते -रिते || ५ ||

- रमेश ठोंबरे

३. || प्रियेवरी चंद्र ||

प्रियेवरी चंद
पुरताच फिदा |
देखे सदा कदा
प्रियतमा || १ ||

मोकळाले केस,
पांघरुनी शांत |
अमावशी भ्रांत,
दावितसे || २ ||

पौर्णिमेचा चंद्र,
तिलाची म्हनीतो |
पुरता जाणितो,
प्रिया रूप || ३ ||

आज हि करितो
वेगळाच लोच्या
छतावरी तिच्या
रेंगाळतो || ४ ||

परी तो खट्याळ
लोचटहि फार |
प्रियेचे उभार
न्ह्याळीतसे || ५ ||

- रमेश ठोंबरे

२. || प्रियेचे चरण ||

प्रियेचे चरण,
भाजले उन्हात |
चटके मनात,
बसलेले || १ ||

सोसवेना तिला,
सकाळचे उन |
शहारते मन,
पाहुनिया || २ ||

नाजूक ती काया,
झाली लाले-लाल |
डोळियांचे हाल,
माझ्याच का ? || ३ ||

वाटे उचलून,
न्यावी एका हाती |
आड येती मती,
सज्जनाची || ४ ||

चरण भूवरी
पाहुनिया थेट |
काळजाची वाट
रमेशाच्या || ५ ||

- रमेश ठोंबरे

१. || प्रियेचे हे रूप ||

प्रियेचे हे रूप,
पहिले म्या डोळा |
भाव तो वेगळा,
लोचनात ||१||

अधरी तियेच्या
विसावली धुंदी
होऊनिया बंदी
पडीयलो ||२||

सुटेनात आता,
मोहाचे ते पाश |
लागलाची ध्यास,
दर्शनाचा ||३||

रोज होते भेट
नित्य वाटे नवे
काय काय घ्यावे
साठऊन ||४||

अडलो पुरता
प्रियेच्या रुपात
रात हि जपास
पुरी नसे ||५||

- रमेश ठोंबरे