निषेध
कधी आमच्या भागात केली जाते घूसखोरी
तर कधी पळवल जात आमच विमान.
कधी उडवल्या जातात आमच्या सैनिकांच्या छावण्या
तर कधी केला जातो बुद्ध मुर्तिंचा अवमान.
पण आम्ही शांत आहोत.
आमचा देश शांत आहे !
तलवारीनं केलं केल जातय शिरकाण
अन तोफानी घेतले जातात हजारो निरापराध्यांचे प्राण .
मारतानाही केला जातो अमानुष विचार
अन हिंसेलाही लाजवतील असे भयानक अत्त्याचार.
तरीही आम्ही शांत आहोत...
आमचा देश शांत आहे !
आमचा देश अहिंसक आहे !
पाकिस्तान कुरापती काढतो आहे
चीन ही कधी कधी लढतो आहे ..
आणि आता तर ..
ज्यांचे नावही नकाश्यावर लवकर सापडणार नाही ..
असे ही करत आहेत उघड - उघड हल्ले.
आम्ही त्याना उत्तर देतो..
पाठवतो एखाद प्रेमपत्र.
आमचा प्रेमाचा संदेश
आमच्या देशाचा प्रेमाचा संदेश !
एवढ सगळ झाल्यावर
आम्ही धरतो आग्रह सत्याचा,
आम्हालाच गिळंकृत करू पाहना-या..
महासत्ताक दलालांकडे ..
त्यांच्या समोर मांडतो सगळ सत्य...
अन करतो सत्याग्रह.
डीवचतानाही शांत राहतो.
हिंसेत ही अहिंसा पाळतो.
द्वेष करणाऱ्यांना प्रेम-पत्र देतो
आणि नेहमी सत्याचा आग्रह धरतो.
अन झाल्या प्रकाराबद्दल खुपच संताप आला तर ...
पत्रकार परिषद् बोलावून
भिंतीवर निरागस हास्य करत लटकणाऱ्या
महात्म्याच्या साक्षीने
व्यक्त करतो तीव्र निषेध !
- रमेश ठोंबरे
पाठवतो एखाद प्रेमपत्र.
आमचा प्रेमाचा संदेश
आमच्या देशाचा प्रेमाचा संदेश !
एवढ सगळ झाल्यावर
आम्ही धरतो आग्रह सत्याचा,
आम्हालाच गिळंकृत करू पाहना-या..
महासत्ताक दलालांकडे ..
त्यांच्या समोर मांडतो सगळ सत्य...
अन करतो सत्याग्रह.
डीवचतानाही शांत राहतो.
हिंसेत ही अहिंसा पाळतो.
द्वेष करणाऱ्यांना प्रेम-पत्र देतो
आणि नेहमी सत्याचा आग्रह धरतो.
अन झाल्या प्रकाराबद्दल खुपच संताप आला तर ...
पत्रकार परिषद् बोलावून
भिंतीवर निरागस हास्य करत लटकणाऱ्या
महात्म्याच्या साक्षीने
व्यक्त करतो तीव्र निषेध !
- रमेश ठोंबरे
No comments:
Post a Comment