Aug 25, 2011

माझं पाहिलं प्रेम



मी कवितेसाठी खूप काही केलं, असं म्हणण्यात तथ्य नाही
जे काही केलं ते कवितेन केलं, या शिवाय दुसरं सत्य नाही।



कविता ! माझ्या अत्यंत जिव्हाळ्याची, कवितेची आणि माझी ओळख फार पूर्वी मी जेमतेम बारा वर्षाचा असतानाच झाली, तेव्हाच आमचं प्रेम जमलं। अगदी प्रेम म्हणजे काय हे माहित नसतानाच ! कविता कविता म्हणत मी कवितेच्या जवळ गेलो आणि प्रेम एक प्रेम म्हणताना कवितेच्या प्रेमात पडलो. आमच्यात एक भावनिक नातं निर्माण झालं आणि आम्ही एक-दुसर्या शिवाय अर्थहीन बनून गेलो. तेव्हापासूनची माझी आणि तिची जवळीक आहे. पुढे भेटीनं भेट वाढत गेल्यावर आमच्यातील दरी आणखी कमी झाली आणि शेवटी कविता म्हणजे मी आणि मी म्हणजे कविता असंच काहीसं आमचं नातं निर्माण झालं.

तेव्हा जवळ जवळ सात-आठ वर्षापूर्वी भेटलेली ती कविता थोडीशी अबोली होती, लाजरी होती, वेन्धळी होती बालमनान विचार करणारी आणि बालकथेत रमणारी होती. गम्मत जम्मत करणारी, हळूच इसाप्नितीत शिरून हलकीसी शिकवण देणारी होती. मीही तसाच कविते प्रमाणे अबोल होतो. पण आज माझ्यात बदल झालेत. आज मी बोलू लागलोय. तेव्हा बालमनाने विचार कवित होतो आता विचारांना प्रोढत्व आलंय, सामाजिक जाणीव झालीय. माझ्या बरोबर कविताही बदलत गेलींय तेव्हाची अबोली आता खरच बोलू लागलीय, लाजरी तशीच पण विद्रोही झालीयं, गांधी वादाचा पुरस्कार करते पण एका गाला पुरताच ! दुसर्या वेळेचा गांधी विरोधी आवाज समोरच्याच्या गालात करते. गांधीची काठी म्हणजे कधी तिला आधारस्तभ वाटतो तर कधी त्यांच्या शिकवणीत उणीव राहिल्याची जाणीव हि तिला प्रकर्श्याने होते. आजही शक्य तोवर ती सत्याग्रहच करते तर कधी नाविलाजास्तव तीच अहिंसावादी कविता हिंसक बनते. तेव्हाचा तिचा प्रखर चेहरा मला बरंच काही सांगून जातो. तिच्यातील संयम आणि कुठे तरी धगधगत असणारा निखारा !

आज आमच्यात इतके बदल होऊनही आमच्यातील नातं भावनिक आहे, वैयाक्तिक आहे, त्याचा उहापोह उघड्यावर काही आंबटशौकिन्यांसमोर करावा असा विचारही माझ्या मनात येत नाही। मला नेहमीच वाटत वक्त्याने भाषण कराव खऱ्या श्रोत्यांसमोर, गायकाने आलाप घ्यावा खऱ्या रसिकांपुढे आणि कवीने मनातील कविता ओठावर न्यावी खऱ्या काव्यप्रेमिंपुढे.

मला बऱ्याच वेळेस मोह झाला आमचे 'प्रेमप्रकरण' 'कॉमन' करण्याचा, पण का कुणास ठाऊक कवितेचा विचार करताना मला ते सुरक्षित वाटलं नाही, उगीच मनात भिती वाटली दुनियेच्या नजरांची, समाजाच्या बटबटीत डोळ्यांची आणि आपल्या खेरीज सगळी दुनिया म्हणजे चेष्टेचा विषय आहे असं समजणाऱ्या कूपमंडूकांची ! आज जेव्हा जेव्हा मी या आणि अश्याच काही विचारांनी वेडा होतो तेव्हा कविताच माझी समजूत काढते, माझ्यातील आत्मविश्वास वाढवते. समाजाला सामोरे जाण्याचे आणि चेष्टेखोर नजराणा नजर देण्याचे धर्य माझ्यात असल्याची जाणीव करून देते.

कवितेच्या त्या पहिल्या भेटीनंतर मी तिच्या प्रेमाबद्दल साशंक होतो पण त्यानंतरची प्रत्येक भेट माझा आत्मविश्वास वाढवत गेली, आमचं प्रेम वाढवत गेली। आज मी तिच्या आणि माझ्या भविष्याबद्दल ठामपणे बोलू शकतो यातच मला माझ्या आणि तिच्या प्रेमाची सार्थकता जाणवते.

आज इतक्या वर्षानंतर हि आमच्या प्रत्येक भेटीत मला कवितेच नाविन्य दिसून येते. तिची प्रत्येक कल्पना नवीन आणि या प्रत्येक कल्पनेचा एक नवीन अविष्कार, हेच तिचं खास वैशिष्टे कधी कधी असंच कवितेशी एकरूप झालेलो असताना तिच्यातील एखाद्या नव्या खुबीचा मला साक्षात्कार होतो आणि उगीच मनात विचार येंउन जातो. वाटत इतक्या वर्ष्यानंतर हि मी हिला पूर्णपणे कसा ओळखू शकलो नाही पण आता अनुभवाने मला हे कळून चुकलंय कि, कवितेचं विश्व आणि मन खरोखरच गूढ आहे, तिला पूर्णपणे जाणून घेण्यास निदान हा जन्म तरी अपुरा आहे

आजच्या प्रेमिकांच्या भेटी वाढत जातात तसं त्यांच्यातील शारीरिक अंतर कमी होतं पण मनानं ते पुढ-पुढ उदासीन होऊ लागतात। पहिल्या भेटीनंतरची ती ओढ दुसऱ्या प्रत्येक भेटीनंतर कमी कमी होत जाते आणि आत्मिक प्रेमातील अंतरही वाढत जातं. परंतु कवितेच्या आणि माझ्या प्रेमात आस कधी झालं नाही. कवितेच्या प्रत्येक भेटीत तिच्या अनेक कल्पनांनी मला तिच्यातील अगणित अविष्कारांची जाणीव झाली. प्रत्येक वेळी कवितेची एक नवीनच छबी माझ्यासमोर येत गेली तिचे नाविन्य मला भावत गेलं .... आव्हान देत गेलं . तिच्या आणि माझ्या प्रत्येक भेटीत मी तिच्या अधिक जवळ गेलो आणि नयनांच्या मुक्या संवादांनी आमची मन एकमेकांत गुंतली गेली. कधी तिच्या सौद्न्दार्यान कधी स्वभावानं , कधी लाडिक, विलोभनीय हास्यानं कधी लटक्या रागान तर कधी निरागस प्रेमानं मला मोहित केलं आणि मी प्रेमांकित झालो.

आज मी कवितेशिवाय माझ्या जीवनाचा विचार करतो तेव्हा मला ते निस्तेज वाळवंटा समान भरकटलेल दिसत, कवितेच्या प्रेमाशिवाय जीवन हि कल्पनाच मला करवत नाही. आज कविता मला जो आत्मिक आनंद देऊन जाते तो आनंद मला इतरत्र कुटेच मिळत नाही. माझ्या मनाला भूक आहे ती कवितेच्या प्रेमाची तिच्या प्रेमाशिवाय तिच्याकडून मला फारशी काश्याचीच अपेक्षा नाही. असलीच तर ती विनंती आहे तिचं माझ्यावरील प्रेम सदैव दुव्गुनीत करण्याची.

आता या विद्येच्या अराध्य देवतेकडे, सरस्वती कडे काही मागाव आस काहीच उरलं नाही. मला जे हवं होतं ते तीन न मागताच दिलंय, शब्दांची साथ, यमकांची जाण ! आणि कवितेचं चिरंतर प्रेम. म्हणूनच कविता हेच माझं पहिल प्रेम ! शेवटी त्या आणि तिच्या अराध्य देवतेन स्वत: कवितेन आणि तिच्या रसिकांनी यवढच जाणून घ्याव कि -

माझं पहिल प्रेम फसल्यावर, दुसरं प्रेम हसवू शकणार नाही,
र्हुदय माझं प्रेमांकित आहे प्रेमभंग पचवू शकणार नाही.

--- रमेश ठोंबरे
दि. १/१/१९९७


No comments:

Post a Comment