मराठी कविता समूहाच्या "अशी जगावी गजल - भाग १४" या सदाबहार उपक्रमातील माझा सहभाग
देवही मज ज्ञात असावा
ध्यास असा दिन रात असावा
पडता पडता उठलो आहे
डोई 'त्याचा' हात असावा
बाळ कुपोषित रडते आहे
नेता कोणी खात असावा
आज अचानक भिडले डोळे
प्रेम नव्हे आघात असावा !
देव बहीरा ऐकत आहे
मुकाच कोणी गात असावा
म्हणे रमेशा जरी हरवला
फक्त तिच्या हृदयात असावा
- रमेश ठोंबरे
देवही मज ज्ञात असावा
ध्यास असा दिन रात असावा
पडता पडता उठलो आहे
डोई 'त्याचा' हात असावा
बाळ कुपोषित रडते आहे
नेता कोणी खात असावा
आज अचानक भिडले डोळे
प्रेम नव्हे आघात असावा !
देव बहीरा ऐकत आहे
मुकाच कोणी गात असावा
म्हणे रमेशा जरी हरवला
फक्त तिच्या हृदयात असावा
- रमेश ठोंबरे