'तुझी सावली होऊन'* राहावं आयुष्यभर
हेच तर स्वप्न होतं माझं
पण आताशा
हे स्वप्नच लादलं जातंय माझ्यावर
असंच वाटत राहत अधूनमधून …
पूर्वी तुझी सावली पडायची
योग्य दिशेला आणि योग्य उंचीची
आताशा
ओढाताण होते माझी
तुझ्या सोबत अडजस्ट होताना !
मध्यानिलाही आताशा सावली पडते लांबलचक
अन सुर्य अस्ताला जाताना घुटमळते पायात.
कधी कधी दिवसा उजेडात …
मीच मला शोधत फिरते
आणि रात्रीच्या गर्भ अंधारात
थैमान घालतात सावल्या
एकीच्या दोन आणि
दोन्हीच्या अगणित होवून !
मी पाहिलं होतं स्वप्न
विश्वासाचं, विश्वासानं
तुझ्या सावलीच्या रुपात
माझीच मला होतेय सध्या दिशाभूल
तुझ्या वेगाचाहि येत नाही अंदाज
म्हणून ….
आताशा तुझ्या सोबत असले तरी
तुझी सावली होऊन राहणं
जमेलच असं वाटत नाही !
- रमेश ठोंबरे
('आमकस' च्या लिहा ओळीवरून* कविता या उपक्रमातील दुसरी कविता)
हेच तर स्वप्न होतं माझं
पण आताशा
हे स्वप्नच लादलं जातंय माझ्यावर
असंच वाटत राहत अधूनमधून …
पूर्वी तुझी सावली पडायची
योग्य दिशेला आणि योग्य उंचीची
आताशा
ओढाताण होते माझी
तुझ्या सोबत अडजस्ट होताना !
मध्यानिलाही आताशा सावली पडते लांबलचक
अन सुर्य अस्ताला जाताना घुटमळते पायात.
कधी कधी दिवसा उजेडात …
मीच मला शोधत फिरते
आणि रात्रीच्या गर्भ अंधारात
थैमान घालतात सावल्या
एकीच्या दोन आणि
दोन्हीच्या अगणित होवून !
मी पाहिलं होतं स्वप्न
विश्वासाचं, विश्वासानं
तुझ्या सावलीच्या रुपात
माझीच मला होतेय सध्या दिशाभूल
तुझ्या वेगाचाहि येत नाही अंदाज
म्हणून ….
आताशा तुझ्या सोबत असले तरी
तुझी सावली होऊन राहणं
जमेलच असं वाटत नाही !
- रमेश ठोंबरे
('आमकस' च्या लिहा ओळीवरून* कविता या उपक्रमातील दुसरी कविता)
प्रत्येक बाईचं आयुष्य असचं असावं
ReplyDeleteतुमच्या कवितेसारखं !
तिहि धडपडते नवर्याचि सावली व्हायला ...
सुरवतिला जुळते पण ..
मग मात्र ती थकते मनाने आनि शरिरानेही ..
सगळ्यांचे करता करता तीच हरवुन जाते कुठेतरि ...
आणि शेवटी एक अडगळ होवुन राहते .....
आजही एकविसाव्या शतकात शिकली सवरली तरी खुप कमी ठिकानी ती माणुस म्हनुन जगते आहे ..
खेड्यात तर नाही म्हट्ले तरी चालेल ....