एकीवर बलात्कार
एकीचा खून ...
एक फारच अबला
मेली आपणहून ...!
गावातली सरपंच
उंबऱ्याच्या आत ...,
कारभार पाहतात,
पदाचे नाथ ... !
काळाची गरज,
महिला आरक्षण
आरक्षित शीटाचे
जन्मापासून भक्षण !
सासरचा जाच
कोरडी विहीर
महिला दिनी
सफल वीर ...!
वर्तमान पत्रातले
आजचे वर्तमान
दैनंदिनीत
तेवढेच ज्ञान !
- रमेश ठोंबरे
08/03/2010
वरील ओळीत कुठेच काव्य नाही असा आरोप होऊ शकतो ...!
कुणाला अढळल्यास निव्वळ योगायोग समजावा.
...... कारण वरील ओळी देशाच्या दैनंदिनीतून साभार घेतल्या आहेत.
(सोमवार, दी. ०८/०३/२०१०)
No comments:
Post a Comment