Oct 30, 2015

तुला चर्चेत घेणेही अताशा टाळतो आहे


.
तुला चर्चेत घेणेही अताशा टाळतो आहे
तुझे हे सोवळेपण मी जरा सांभाळतो आहे
.
किती रंगात मिसळावे तुझे तारुण्य मिसळेना
अश्या निर्भेळ रंगाला कधीचा भाळतो आहे
.
कसा घोंगावतो आहे चिडूनी वात मदनाचा
कुणी सांगितले त्याला, तुला कुरवाळतो आहे
.
तुझा हा स्पर्श कांतीचा फुलवतो आस जगण्याची
तुझ्या श्वासात मिसळोनी श्वास गंधाळतो आहे
.
तुझ्या डोळ्यात पाहू दे ! जरा अंदाज घेऊ दे !
जगाच्या लुप्त होण्याचे, विवर पडताळतो आहे
- रमेश ठोंबरे

No comments:

Post a Comment