विधायकजी डीएसपी दुष्यन्त साहेबांना गुंडाळण्याचा भरपूर प्रयन्त करतात पण दुष्यन्त सर त्यांच्या प्रयत्नांना भीक घालत नाहीत. इकडे बारावी फेल चा शिक्का बसल्यावर मनोज भावासोबत रिक्शा जुगाड चालवू लागतो, पण त्याचा थोडाफार फटका विधायकजींच्या खाजगी वाहतूक व्यवस्थेला बसतो म्हणून त्यांचे जुगाड जप्त करून या दोघांना लॉकअपमध्ये टाकले जाते. इथे डीएसपी दुष्यन्त मनोजला सोडायला सांगतात... मनोज दुष्यन्त सरांच्या वागण्याने आणि पदाच्या पावरनें प्रभावित होतो आणि 'मलाही तुमच्यासारखं डीएसपी व्हायचंय त्यासाठी काय करावं लागेल? ' असा प्रश्न करतो तेंव्हा दुष्यन्त सर त्याला 'फक्त परीक्षेत कॉपी करू नकोस' असा मिश्किल सल्ला देतात. मनोज तो सल्ला मनावर घेतो.... पुढच्यावर्षी फक्त अभ्यासाच्या जोरावर चीटिंग न करता सेकंड क्लासमध्ये पास होतो आणि डी एस पी होण्यासाठी आजीने दिलेल्या पैश्याच्या मदतीने शहर गाठतो परंतु शहरात पाऊल ठेवण्याआधीच पैशांसह त्याची ब्याग पळवली जाती, इकडे डीएसपी परीक्षेसाठी काहीतरी निर्णय येतो आणि हा अभ्यासक्रम रद्द होतो पुन्हा त्याचा संघर्ष सुरु होतो... तीन दिवस उपाशीपोटी काढल्यावर त्याला पांडे भेटतो. तो, आय पी एस च्या तय्यारी साठी दिल्लीला जाणार असतो. मनोज त्याला त्याच्यासाठीही दिल्ली तिकिटासाठी विनंती करतो आणि त्यालाही आय पी एस बनायचंय असं सांगतो. पांडे त्याचा अवतार पाहुन हसतो पण त्याच्या डोळ्यातली चमक आणि परिस्तिथी पाहुन त्याला मदत करतो आणि दिल्लीला घेऊन येतो.
मनोज दिल्लीत येतो, दोन दिवस पांडेकडे राहतो नंतर स्वतःसाठी काम शोधतो.... पुढे दोघांनाही त्याचा स्वतःच शेवटचा अटेम्ट देणारा गुरु गौरीनंदन भेटतो ... मनोज अतिशय मेहनतीनं प्रिलीम पास होतो... पुढे त्याला श्रद्धा भेटते .... मनोज मेन एक्साम फेल होतो... आणि मग पुन्हा रिस्टार्ट...! 15 तास काम... रात्री अभ्यास आणि पुन्हा एक्साम्स ... पुन्हा प्रिलीम्स पुन्हा मेन्स... आणि शेवटी शेवटचा अटेम्ट!
मधल्या काळात बरंच काही घडतं... श्रद्धा - मनोज... मनोजचा मित्र पांडे... गौरीनंदन ... मनोजचे वेगवेगळे गुरु आणि बरंच काही.
पुढे मनोजच काय होतं श्रद्धाच काय होतं आणि दोघांच्या नात्याचं काय होतं हे पाहण्यासाठी चित्रपट पाहणं गरजेचं आहे, तुम्ही पहा तुमच्या मुलांना दाखवा... चित्रपट सुंदर आहे थियटरला किती चालला माहित नाही पण ओटीटी वर रेकॉर्ड ब्रेक करतो आहे!
चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे ... यापूर्वी यावर एक कादंबरी ही याच नावाने येऊन गेली ती अनुराग पाठक यांनी लिहिली आहे.. त्यानंतर विधू विनोद चोप्रा यांनी हा सर्वांग सुंदर आणि प्रेरणादायी चित्रपट बनवला आहे..!
सर्वच कलाकारांनी खूप सुंदर अभिनय केला आहे, मुख्य भूमिकेत असणारा विक्रांत मेस्सी आणि श्रद्धा, गौरीनंदन आणि पांडे यांच्या भूमिका करणारे कलाकार विशेष लक्षात राहतात.
चित्रपट पाहताना कितीतरी वेळेस डोळे भरून आले... Mpse, upse ची तय्यारी करणाऱ्या कितीतरी मित्रांचे चेहरे आणि भविष्य डोळ्यासमोरून गेलं !
रियल लाईफ मधील मनोज आणि श्रद्धा यांचे बरेच interview youtube वर आहेत तेही पाहण्यासारखे आहेत... Apb maza वर माझा कट्टा मधील मुलाखत आहे त्यात दोघे ही खूप सुंदर मराठी बोलतात ऐकून हेवा वाटतो !
सोबत रिल लाईफ आणि रियल लाईफ चा एकत्र फोटो आहे पहा म्हणजे लक्षात येईल की, बाओपिक बनवताना अभिनयासोबत कलाकारांचं दिसणं सुद्धा किती महत्वाचं असतं. कलाकाराच्या निवडीबाबतही एक interview youtube वर आहे !
चित्रपट : 12th FALE
दिग्दर्शन : विधू विनोद चोप्रा
कलाकार : विक्रांत मेस्सी, मेधा शंकर, अनंत जोशी, अंशुमन पुष्कर
IMDb reting : 9.2/10
#12thpass
No comments:
Post a Comment